Library
Sunday, April 29, 2012
पेन ड्राइव्ह विसरा, गुगल ड्राइव्ह वापरा
माहिती साठवा गुगल ड्राइव्हवर
म. टा. प्रतिनिधी । मुंबई
डेटा ट्रान्स्फरसाठी ई-मेल किंवा पेनड्राइव्हला पर्याय नसल्याच्या मर्यादेवर गुगलने मात केली असून 'गुगल ड्राइव्ह'च्या रूपाने ही सेवा https://drive.google.com वर नेटकरांसाठी खुली झाली आहे. या सेवेमुळे ५ जीबी डेटा ऑनलाइन सेव्ह करणता येणार असून, तो कुठुनही वापरता येईल.
लोकप्रिय सर्च इंजीन असलेल्या गुगलने यापूवीर् डॉक्स, जी+, पिकासा, यू, प्ले अशा विविध सेवा सुरू केल्या आहेत. त्यात आता भर पडलीय 'ड्राइव्ह' सेवेची. यामुळे आपण आपले फोटो, डॉक्युमेंट्स त्यावर सेव्ह करून ठेऊ शकतो. ही सेवा 'क्लाऊड कम्प्युटिंग' तंत्रावर आधारित आहे. लवकरच या ड्राइव्हमधून डॉक्युमेंट्स, फोटो ई-मेलवरही अटॅच करता येतील. ड्राइव्हमध्ये गुगल डॉक्सही पूर्णपणे वापरता येणार आहे. डॉक्सच्या मदतीने वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट्स या सॉफ्टवेअर्सवर काम करता येईल. ड्राइव्हवर सेव्ह असलेल्या फाइल्स 'जी+'वरील मित्रांबरोबर शेअरही करता येतील.
सर्वत्र अॅक्सेस
> गुगल ड्राइव्ह विंडोज, मॅक कम्प्युटरमध्ये वापरता येईलच, शिवाय अँड्रॉइड फोन, आयफोन आणि टॅबलेट्सवर ही सेवा देण्यासाठी विविध अॅप्लिकेशनही विकसित होतील. अंधांनाही स्क्रीन रीडरच्या मदतीने याचा लाभ घेता येईल.
सर्चेसची सुविधा
> ड्राइव्हवर 'फाइल टाइप', 'ओनर' अशा विविध पर्यायांचा वापर करून फाइल्स सर्च करता येतील. यामध्ये इमेज सर्चचाही पर्याय आहे.
५ जीबीपर्यंत मोफत
> गुगल ड्राइव्हमध्ये ५ जीबीपर्यंतचे स्टोअरेज विनामूल्य करता येऊ शकेल. अतिरिक्त स्टोअरेजसाठी २० जीबी मिळू शकेल. मात्र, त्यासाठी वर्षाला पाच डॉलर्स भरावे लागतील. या सेवेबरोबर जीमेलची स्टोअरेज क्षमता ७.५ जीबीवरून १० जीबीपर्यंत वाढवली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment